कोल्हापूर /ता.१९- प्रतिनिधी

इयत्ता १० वीचा निकाल लागल्यांनंतर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या मार्फत संजय घोडावत पॉलिटेक्निकला अधिकृत प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी सुविधा केंद्राची परवानगी मिळाली. इयत्ता १०वी मध्ये ३५ % व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत आपले नाव नोंदणी करता येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबविली जात असून अर्ज करण्याची मुदत १० ते २५ ऑगस्ट, कागदपत्रे पडताळणी ११ ते २५ ऑगस्ट, प्राथमिक गुणवत्ता यादी २८ ऑगस्ट, गुणवत्ता यादी चुका व दुरुस्ती २९ ते ३१ ऑगस्ट व २ सप्टेंबर ला अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय चे संचालक डॉ.अभय वाघ यांनी परिपत्रकात नमूद केली आहे.
याबाबत संस्थेचे प्राचार्य श्री विराट गिरी म्हणाले विद्यार्थ्यांनी प्रथम ऑनलाईन किट घेणे गरजेचे आहे. ऑनलाईन किटसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४०० रुपये व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये शुल्क आकारले जाते. किट कार्यान्वित केल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणे . कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करणे, कागदपत्रांची तपासणी व पडताळणी याचबरोबर ऑनलाईन अर्ज निश्चिती या सर्व प्रक्रिया या सुविधा केंद्रामार्फत दिल्या जाणार आहेत. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत नाव नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती मिळतात.
डिप्लोमा इंजिनीरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्रामार्फत आपले अर्ज निश्चिती करू शकतात. ज्या विद्यार्थी व पालकांना सुविधा केंद्रावर येथे येणे शक्य नाही . त्यांना देखील घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यामुळे या सर्व प्रक्रियेसाठी लागणारी माहिती व त्याचे योग्य समुपदेशन करण्यासाठी संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये स्वतंत्र समुपदेशन कक्ष तयार करण्यात आला आहे. या सुविधा केंद्रामार्फत तज्ज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थी व पालकांना या सर्व प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जात आहे.
उपक्रमाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेस शुभेच्छा दिल्या आहेत.