..तर संविधानाला धक्का लागल्या शिवाय राहणार नाही-शरद पवार

उल्हासनगर/ प्रतिनिधी

आपण जर जागृत राहिलो नाही तर संविधानाला धक्का लागल्या शिवाय राहणार नाही, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. ते उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले की देशातील नागरिकांना मूलभूत अधिकार देणारी घटना जपली पाहिजे. आज ठिकठिकाणी बाबासाहेबांची दूरदृष्टी दिसते. आज संविधान धोक्यात आलं आहे. आपण जर जागृत राहिलो नाही तर संविधानाला धक्का लागल्या शिवाय राहणार नाही.बाबासाहेबांनी दिलेला अधिकार नसता तर आजूबाजूच्या देशांसारखी परिस्थिती झाली असती.काल पाकिस्तानमध्ये निवडणूक झाल्या सरकार बनेल किंवा नाही माहीत नाही. कालच्या निवडणुकीत खासदार कोणत्या पक्षाचे नाहीत, त्यांना लष्कराची मदत होती. बांगलादेशात तेच झालं, राज्यकर्त्यांची हत्या झाली. तिथे हुकूमशाहीच राज्य होतं.

एक एक वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बसतात. त्याची चिंता आजच्या राज्यकर्त्यांना नाही. संविधानाच्या मूलभूत हक्कावर बोललं गेलं तर हल्ला केला जात आहे. आता हे सर्व जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असेही आवाहन श्री पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!