वडगाव /प्रतिनिधी
वडगाव येथील ब्राह्मण समाज संघ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त २७ वी शारदीय ज्ञानसत्र व्याख्यानमाला आयोजित केली आहे. रविवार दि . १५ आक्टोबर ते २२ ऑक्टोबर पर्यंत दिगंबर जैन मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रोज सायंकाळी ७- ३० ते ८-३० या वेळेत व्याख्यानमाला संपन्न होणार आहे. तरी याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन ब्राह्मण समाज संघामार्फत अध्यक्ष अमोल चरणकर , उपाध्यक्ष अजित पराडकर , कार्यवाह संजय बुवा यांनी केले आहे.

व्याख्यानमालेमध्ये पुढील व्याख्यात्यांची व्याख्याने होणार आहे. (कंसात विषय ) रविवार दि. १५ आक्टोबर – श्री. ईश्वर रायण्णवर ( अनुकरणीय शिवराय ) , दि.१६ आक्टोबर श्री. अभय भंडारी ( विश्वगुरू भारत ? ) ,दि. १७ आक्टोबर- श्री. कृष्णराव माळी ( पर्यटन संवाद ) , दि. १८ आक्टोबर – माजी प्राचार्या कमला हर्डीकर ( पालकत्व एक आव्हान ), दि. १९ आक्टोबर – दिपक पाटणकर (रामायणातील स्त्री व्यक्तीरेखा ) दि. २० आक्टोबर – संतोष पाटील ( प्रेरणेची वाट ) ,दि. २१ आक्टोंबर – श्री. धनंजय भाटे व सहकारी ( गीतबहार ) , दि. २२ आक्टोबर – श्री वासुदेवराव जोशी ( किर्तनरंग ) अशी व्याख्याने होणार आहेत.
व्याख्यानमालेचे आयोजन दत्ता सपाटे , प्रा. वसंतराव जोशी , वासुदेव अंबपकर , प्रमोद देवस्थळी , सुरेशदादा देवस्थळी , अॅड. विवेक कमलाकर , रमेशचंद्र जोशी , राजेंद्र देवस्थळी , डॉ. सुहास आळतेकर , अभिजीत चरणकर , अतुल देशपांडे , डॉ. सचिन जोशी , ॲड. समीर मुंगळे यांच्यासह ब्राम्हण बांधवांनी केले आहे. व्याख्यानमालेसाठी गोपाळराव कुलकर्णी , पत्रकार नंदु कुलकर्णी व आळतेकर परिवाराने विशेष सहकार्य केले आहे .
