श्री शशिकांत महादेव रानडे यांच्या जाण्याने इचलकरंजी शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक, व सामाजिक क्षैत्रातील सर्वागीण संलग्न असा दुवा निखळला त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्या समोरील नगरपालिकेच्या गाळ्यात असलेले कोपऱ्यातील स्टेशनरीचे दुकान म्हणजेच “शशिकांत महादेव रानडे स्टेशनरी” या विस्तृत नावाचे दुकान आणि इचलकरंजीकर यांचे गेल्या २५-३० वर्षाचे नाते इचलकरंजी नगरीतील जवळजवळ सर्वच घरात निश्चितच कधीनाकधी तरी एखादी वस्तू या दुकानातुन खरेदी करून जुळलेले असेल,यात शंका नाही.
त्यांच्या दुकानात दुपारी विश्रांतीची वेळ सोडून कधीही जा,कौंटरच्या सुरवातीच्याच असलेल्या आडोशाच्या काचेच्या मागे गल्ल्यावर बसलेले शशिकांतराव हसतमुख स्वागतार्ह मुद्रेने बघतील,आणि मागणी प्रमाणे वस्तू समोर ठेवत,चौकशी करतील.अर्थात त्यांचा अनेकांशी परिचय. विविध संस्था, शाळा, सोसायट्या,बँका मधील कर्मचारी वर्ग ,यासह बहुतेकांना स्टँडर्ड स्टेशनरी वस्तू ही शशिकांत रानडे यांच्या दुकानातच मिळणार याची खात्री. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या दुकानात नेहमीच गर्दी.
शालेय जीवनापासून मी देखील येथेच वेळोवळी पेन, अखीवताव,लेजर ,डायरी,णि इतर अनेक वस्तू खरेदी केलेल्या आहेत. विशेष म्हणजे,वस्तु खरेदीवेळी एखादी वस्तू मागतली कि , शशिकांतराव आँर्डर देत आणि माळ्यावरील गोडावनच्या झरोक्यातुन नोकर मग ती रस्सीच्या बकेट मधुन कौंटरवर सोडत असे. त्याकाळी असे हे बघण्यात एक गंमत वाटे.
आज शशिकांत रानडेच्या निधनाचे वृत्त वाचले. आणि सारे चित्र अतःचक्षु समोर तरळून राहिले. त्यांचा अनेक संस्थाशी निकटचा संबंध होता. मला आठवतय चिन्मय मिशनचे ते सक्रीय सदस्य होते. मिशनच्या व्याख्यानमाला सुरु असत तेंव्हा त्यांची धावपळ विशेष जाणवत असे.
भगवत गीतेवरील स्वामी पुरुषोत्मानंदाची व्याख्याने याच काळात तत्कालीन अर्बन बँकेच्या हाँल मध्ये ऐकली. आणि अशाच एका कार्यक्रमात, प्रत्यक्ष स्वामी चिन्मयानंदाचे,अगदी हस्तपदस्पर्श करुन दर्शन घेता आले.
आज या क्षणीहि स्मरण प्रखरपणे होते. इचलकरंजीच्या औद्योगिक ,शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्याना शशिकांत रानडे यांचा परिचय नसेल, अस क्वचितच म्हणावे लागेल, कारण इचलकरंजीत साड्या व इतर वस्तू कुठेही खरेदी करा पण स्टेशनरीसाठी हे एकच नांव त्याकाळी सर्वदूर घेतल जात असे.अलीकडे सर्वच व्यवहार पेपरलेस,सह इतरही अनेक वस्तूंचा वापर दुर्मीळ होत असतानाच,आणि आता सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात बहुतांशी व्यवहार ठप्प पडले जात असतानाच भविष्य कसे असेल याचीच चिंता सगळ्यांना लागली आहे.अशा वास्तवात या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा देताना, मन हळहळते.
आठवतयं आजही कधी काळी वर्षांकाठी एखादी वस्तू खरेदी केल्यावर निळ्या ठसठसती टाईप मधील “शशिकांत महादेव रानडे स्टेशनरी” असे नववर्षाचे कँलेडर शशिकांतराव आवर्जुन हातात द्यायचे….आता अशी कँलेडर संस्कृतीहि कालबाह्य होत असलेल्या काळात मागे वळून पाहताना …..आता उरल्या केवळ आठवणी….. आणि आठवणीच…पुन्हा एकदा दिवंगत शशिकांत महादेव रानडे यांना विनम्र श्रध्दांजली.
सुर्यकांत देशपांडे.
नालासोपारा,ता.वसई
( मो.नं ७४९८१५५१९८)