महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’- कृषी आयुक्त धीरज कुमार

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) :

    महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावेत, असे आवाहन पुणे कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
   महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शीर्षकाअंतर्गत ‘बियाणे’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअतंर्गत लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध असून 15 मे पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
   महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ या संकेस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडवा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक/ लॅपटॉप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थावर प्रमाणित करुन घ्यावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी करावी. आधार नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा. त्याशिवाय अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
 यासाठी जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घ्यावी. यामध्ये कोणतीही अडचण असल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई मेल वर किंवा 020-25511479 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ साठी फॉर्म भरण्यासाठी खालील बटनावर क्लीक करा…

error: Content is protected !!