कोकणात रंगला शिमगोत्सवाचा सोहळा!

रत्नागिरी : जिल्हाभरात शिमगोत्सवाच्या ‘धुलीवंदन”चा जल्लोष सोमवारी गावागावात रंगला…ढोल-ताशांचा गजर…फाकांद्वारे देवांचा जयघोष आणि खांद्यावर, डोक्यावर घेत ग्रामदेवतांच्या पालख्या खेळवल्या-नाचवल्या गेल्या. तर त्या देवतांच्या शिमगोत्सवाच्या भल्या मोठ्या उंचीच्या आणि वजनाच्या होळ्या (शेंडे) गावांच्या सहाणेवर एकजुटीने उभ्या करून गावकऱ्यांच्या एकजुटीच्या दर्शनाचा जणू सोहळा रंगला. शिमगोत्सवाची धुळवड सोमवारी २५ मार्च रोजी ‘धुलिवंदना “ने रत्नागिरीत मोठ्या उत्साहात रंगली. या दिवशी गावोगावचे पौर्णिमेचे, भद्रेचे शिमगे साजरे झाले. त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन धुळवड साजरी करत ग्रामदेवतांच्या होळ्या उभ्या केल्या. गावाच्या होळीला आणि ग्रामदेवतेच्या पालखीला खांदा लावण्यासाठी कोकणी माणूस सारं बाजूला ठेवून या उत्सवात अगदी रंगून गेला होता.

error: Content is protected !!