शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीमध्ये लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन …

हातकणंगले /ताः १

           साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहीरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रचंड बळ दिले. त्यांनी आपल्या साहित्यातून सामान्य कष्टकरी जनतेची दुःखें वेशीला टांगली . असे प्रतिपादन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या कार्यस्थळावर आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती समारंभात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र डॉ . अशोकराव माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल कांबळे होते

          अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष समाजभूषण अनिल कांबळे -माणगांवकर म्हणाले , लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून अन्याया विरुद्ध लढणारा बंडखोर नायक निर्माण करून दलित, उपेक्षित, कष्टकरी या घटकांना स्वाभिमान शिकविला. व शेवटी “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव” हे काव्य रचून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना व त्यांच्या कार्याला काव्यातून आदरांजली व्यक्त केली .

         यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक अमर धुमाळ,चिंतामणी निर्मळे, नानासाहेब राजमाने . सीइ ओ दिलीप काळे, एम डी वैभव पाटील, जी.आर. माने,विवेक कुलकर्णी, राजेंद्र शेवाळे, जगदीश जाधव, नायकु माने,शेषगोंडा पाटील,सुहास राजमाने, सतिश राजमाने उपस्थित होते. स्वागत रितेश शिंदे यांनी केले. तर आभार विनोद सुतार यांनी मानले.

error: Content is protected !!