जयसिंगपुर /ता : १३

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून एन डी आर एफ ची दोन पथके बुधवारी शिरोळ तालुक्यामध्ये दाखल होत आहेत .कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका पूरप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो . यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे . त्यावेळी तालुक्याला त्याची जास्त झळ बसलेली आहे . मागील वर्षी सन २०१९ मध्ये ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूराची मोठी आपत्ती आली होती, या आपत्तीमध्ये सर्वात जास्त नुकसान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यांमध्ये झालेलं होतं तालुक्यातील ५२ पैकी ४२ गावे बाधित झालेली होती .आणि यामुळेच जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता . यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते . शिरोळ तालुक्यामध्ये जर पूरपरिस्थिती निर्माण झाली . तर बाधित होऊ शकतील . अशा गावातून लोकांना त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतरित करता यावे . यासाठी नियोजन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आदेशान्वये शिरोळ तालुक्याचे तहसीलदार , गटविकास अधिकारी त्याचबरोबर पोलिस प्रशासन यांनी केले आहे, शिरोळ तालुक्यामध्ये जास्तीत जास्त यांत्रिक बोटी याव्यात यासाठी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले आणि आग्रह धरला होता . आणि याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने जवळपास 50 यांत्रिक बोटी जिल्ह्यामध्ये सज्ज ठेवल्या आहेत . यातील १५ यांत्रिक बोटी या शिरोळ तालुक्यासाठी वापरल्या जाणार आहेत . प्रत्येक बोटीसोबत लाईफ जॅकेट व अद्यावत असे साहित्य शिरोळ तालुक्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे . याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या स्वयंसेवकांची मोठी फौज जिल्हा प्रशासनाने सज्ज केली आहे . यातील साधारणपणे जवळपास तीनशे ते साडेतीनशे स्वयंसेवक एकट्या शिरोळ तालुक्यामध्ये महापुराच्या कालावधीमध्ये कार्यरत रहातील . यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे, शिरोळ तालुक्यातील महापुरामुळे बाधित होणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये स्वयंसेवकांचे पथक बोटी सह सज्ज राहील . यासाठीचे नियोजन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आदेशाने आपत्ती विभागाने केले आहे . याबरोबरच गतवर्षीच्या महापुरातील अनुभव घेऊन महापुर येण्यापूर्वीच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच एन डी आर एफ ची २ पथके शिरोळ तालुक्यामध्ये बुधवार दिनांक १५ जुलै रोजी दाखल होत आहेत . दोन्ही पथके शिरोळ तालुक्यामध्ये पूर्णवेळ बंदोबस्तासाठी उपस्थित असणार आहेत.
