शिव आरोग्य सेनेच्या हातकणंगले तालुका समन्वयकपदी रतन वाझे

शहर प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा

   शिवसेना उध्दव ठाकरे गट प्रणित शिव आरोग्य सेनेच्या हातकणंगले तालुका समन्वयकपदी सामाजिक कार्यकर्ते रतन वाझे यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, उपनेते संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
   या निवडीनंतर रतन वाझे यांनी, आरोग्य सेनेच्या माध्यमातून ठाकरे सेनेचे विचार घराघरापर्यंत | पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, माजी आमदार उल्हासदादा पाटील, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हा प्रमुख वैभव उगळे, शिव आरोग्य सेनेचे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर विभाग अध्यक्ष डॉ. ऋषभ चौगुले, राज्य सचिव डॉ. अजित पाटील, शिवसेना संघटक चंगेजखान पठाण, कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!