शिवसेना स्टाईलने कर्नाटकात घुसून उत्तर देणार – जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

हुपरी / ता : ९- प्रतिनिधी

         मनगुत्ती (जि.बेळगांव ) येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तमाम शिवप्रेमींनी सन्मानाने उभा केलेला अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने दडपशाहीने हलविला आहे.
          छत्रपती शिवाजी महाराज व सीमाभागांतील मराठी भाषिक यांच्याबद्दल नेहमीच चुकीची वागणूक दाखवणाऱ्या कर्नाटकातील भाजपशासित सरकारचा व मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन व जाहीर निषेध आज शिवसेना कोल्हापूर जिल्हा व हुपरी शहर यांच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीजवळ करण्यात आला.

     मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन व जाहीर निषेध करताना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव , शिवसैनिक व शिवप्रेमी …..

      कानडी भाजपा सरकारने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने विराजमान केला नाही . तर शिवसेना स्टाईलने कर्नाटकात घुसून उत्तर देण्यात येईल, असा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान,तालुकाप्रमुख बाजीराव पाटील,शहरप्रमुख अमोल देशपांडे,नगरसेवक बाळासो मुधाळे,माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील, महिला आघाडी तालुका संघटीका सौ.उषाताई चौगुले,शहर संघटिका सौ.मीना जाधव,महिपती पाटील,महेश कोरवी यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!