शिये हायस्कूल ज्युनिअर कॉलेज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

    शिये हायस्कूल ज्युनिअर कॉलेज शिये येथे 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. ज्येष्ठ संचालक डी डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य के.व्ही. बसागरे सर यांनी केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम . डी . पाटील होते.


    यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन, झांजपथक प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी मराठी , हिंदी, इंग्रजी मध्ये विविध विषयावर भाषणे केली . मार्च 2023 मधील १०वी व १२ वी च्या व सारथी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करणेत आला . इयत्ता ५ वी व ६ वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . तसेच वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले .
    यावेळी नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ शिये संस्थापक अध्यक्ष मा . दत्तात्रय गाडवे, तसेच सर्व संचालक उपस्थित होते . जिमखाना विभाग प्रमुख श्री . पाथरे एस .जी . यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले सुत्रसंचालन श्री शैलेश भोसले यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ पवार एस . जे . यांनी मानले .

error: Content is protected !!