गारगोटीसह भुदरगड तालुक्यात सन्नाटा ; विकेंड लॉकडाउनचा परिणाम

गारगोटी /आनंद चव्हाण

    कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊनच्या (weekend lockdown) शासन आदेशाचे गारगोटीसह भुदरगड तालुक्यात काटेकोर पालन करणेत आले. नेहमी गजबजलेल्या परिसराने आज बंद दुकाने, निर्मनुष्य रस्ते, भयाण शांतता , अनुभवली. त्यामुळे गारगोटी व भुदरगड तालुक्यात दिवसरात्र सन्नाटा पसरला होता.

   शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती, दोन दिवसासाठी लागणारा बाजार लोकांनी आदल्या रात्रीच खरेदी केला. आज विकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी सकाळी तालुक्यातील सर्वच दुकाने उघडलीच नाहीत, किरकोळ मेडिकल दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंदच होती, भुदरगड पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता,

    नेहमी गजबज असणाऱ्या क्रांती चौक, एस टी स्टँड परिसरात तसेच मोक्याच्या ठिकाणी पोलीस थांबून होते, त्यामुळे रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते, आज गारगोटीने बंद दुकाने, निर्मनुष्य रस्ते आणि भयाण शांतता, अनुभवली, गेल्या मार्च महिन्यातील हा अनुभव पुन्हा एकदा गारगोटी व भुदरगड तालुक्याने अनुभवला.

गारगोटी येथे नेहमी गजबजलेला असणारा क्रांती चौकातील हा निर्मनुष्य परिसर तर गारगोटीची बाजारपेठ आज अशी सूनीसुनी होती.

गारगोटीत प्रवेश मार्गावर पोलिसांची नाकाबंदी

  विकेंड लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहने आलीच नाहीत, तरीही कांही वाहने गारगोटी शहरात प्रवेश करू नयेत, यासाठी भुदरगड पोलिसांनी गारगोटी प्रवेश मार्गावर कडक नाकाबंदी केली होती, कोल्हापूर मार्गावर खानापूर हद्दीजवळ, आकुर्डे रस्त्याला पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले होते, आज दिवसभर या मार्गावर पोलीस थांबून होते.

error: Content is protected !!