हातकणंगले /प्रतिनिधी
कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाभाव रोखण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील आळते गावात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असुन १ मे सकाळी ११वाजले पासुन ६ मे सकाळी ७ वाजे पर्यंत गावातील दुध डेअऱ्या दवाखाने, औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार पाच दिवस पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय कोरोना दक्षता कमिटीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे सरपंच सौ. सविता संजय कांबळे यानी जाहीर केले असुन गावकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी तसेच भाजीपाला विक्रेत्यानी कोरोनाची चेन तोडण्यासाठी या निर्णयास सहकार्य करावे . तसेच सर्वांनी घरीच रहा. सुरक्षित रहा, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करा. सोशल डिस्टंसिंग ठेवा. विनाकारण फिरु नका. आपल्या कुटुंबास सुरक्षित ठेवा. असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या या बैठकीस तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे सभापती,उपसभापती, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, व ग्रामस्थ उपस्थित होते.