शॉर्टसर्कीटने सायझिंगला आग; १७ लाखांचे नुकसान

इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील सायझिंगमध्ये शॉर्टसर्कीटने भीषण आग लागली. या घटनेत सुताचे कोन, बिमं, विद्युत मोटारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे १७ लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
येथील स्टेशन रोडवर राजेंद्र साखरपे यांच्या मालकीची अथर्व सायझिंग आहे. या सायझिंगमध्ये बुधवारी शॉर्टसर्कीटची ठिणगी पडून आग लागली. त्यामुळे कामगारांनी तत्परतेने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र सायझिंगमध्ये सुताचे कोन, बिमं यासह ज्वलनशिल वस्तु असल्याने बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. महापालिका आणि पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने २ तास ५ बंबांनी पाण्याचा मारात करत ही आग आटोक्यात आणली. या घटनेत सुताचे कोन, बिमं आणि विद्युत मोटारी जळाल्यानं सुमारे १७ लाखाचे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!