क्वांरटाइन सेंटरमध्ये कर्तव्यात कसुर , डॉक्टरांसह संबंधिताना कारणे दाखवा नोटीस लागु ; सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांची माहिती

सोलापूर /ताः ३१

           डब्ल्यू . आय. टी. कॉलेज येथील क्वांरटाइन सेंटर मधील दाखल करण्यात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील एक महिलेचा आज मृत्यू झाल्यामुळे त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकांची चिप्पा, डॉ.काजल कोडीटकर, नियंत्रण अधिकारी प्रताप खरात, सनियंत्रण अधिकारी महेश क्षिरसागर, लिपिक भीम जन्मले, लिपिक अशोक म्हेत्रे, लिपीक सिद्धगोंडा जत्ती तसेच वैद्यकीय अधिकारी वाय. एस पेलेलू यांना कर्तव्य मध्ये कसूर केले असल्याने त्यानं कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहे. 

     तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना सदरच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने या मध्ये जे कोणी दोषी असतील . ज्यांनी कर्तव्य मध्ये कसूर केले असेल त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीसच्या खुलासाअंती आवश्यक ती प्रशासकीय कारवाई सोलापूर महानगरपालिकेचे मार्फत करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त पंकज जावळे यांनी दिली.

error: Content is protected !!