सोलापूर [ताः २८] / प्रमोद गोसावी
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्याकरिता विविध उपाय योजना करण्यात येत असून कोरोना बाधित व्यक्तींना सोलापूर शहरातील सिंहगड कोविड केअर सेंटर मध्ये उपचार देण्यात येत असते. त्यामधून आजपर्यत 1523 व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत . त्याअनुषंगाने आज 1500 चा टप्पा पार केल्यामुळे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त पंकज जावळे यांनी या ठिकाणी भेट दिली .
तसेच या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सोयीबद्दल माहिती जाणून घेतली . जेवणाबद्दल वांरवांर तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने जेवणाची तपासणी करून जेवणामधील त्रुटी जाणून घेतल्या व संबंधित केटर्सना जेवणामध्ये सुधारणा करण्यास सूचना देण्यात आले. सिंहगड कोविड केअर सेंटर येथे रुग्णांसाठी आंघोळीसाठी गरम पाणी तसेच पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून करमणुकीसाठी त्यांना एफएमची सोय करण्यात येणार आहे.येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता व्यवस्थित राहण्यासाठी व पेशंटचा देखील मानसिक आरोग्य व्यवस्थीत राहावे . आजारातून लवकर बरे होण्यासाठी सिंहगड कोविड केअर येथे आज पासून विपश्यना वर्ग सुरू करण्यात आले असून विपश्यना देण्यासाठी उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे हे उपस्थित होते. इतर कोविड सेंटरला सुद्धा लवकरच वर्ग सुरु करण्यात येईल.यावेळी सहायक आयुक्त विक्रम पाटील,केंद्र प्रमुख दीपक पवार, डॉ.वैशाली सिरशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.