सोलापूर [ता: २६]/ प्रमोद गोसावी
कोमाॅबिट रूग्णाकरिता फिरत्या मोबाईल क्लिनिकमध्ये यापुढे एक्सरे मशीनची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली आहे. सोलापूर शहरातील कोरोना बांधीत आणि कोमाॅर्बिट रूग्णाच्या तपासणी करिता थर्मल टेस्टिंग ऑक्सिमिटर आणि ॲटिजन टेस्टिंगच्या आदी उपचार पद्धतीचा वापर केला जात आहे . यामुळे पाॅझिटीव्ह रूग्ण शोधणे सोपे झाले आहे. पण कोमाॅर्बिट रूग्णाचा मृत्यु थांबणे शक्य होणार नाही. याकरिता कोरोना बांधीत आणि कोमाॅर्बिट रूग्णाच्या तपासणी करिता यापुढे फिरत्या फिवर क्लिनिक मध्ये एक्सरे मशीन बसविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिव संकर यांनी दिली.
सोलापूर शहरात कोरोना संसर्गजन्य रोग वाढत असून त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने कोरोनाची चाचणी जलद गतीने होण्यासाठी शहरातील अनेक ठिकाणी कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.आज तेलंगी पछा पेठ ,नई जिंदगी,मनपा शाळा क्र 11 मिलिंद नगर बुधवार पेठ,बाळे, अवंती नगर ,लक्ष्मीविष्णू चाळ या ठिकाणी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी भेट दिली.या लॉकडाऊनमध्ये10 हजार व्यक्तींचा रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे.ज्यांना मधुमेह, रक्तदाब, श्वसन विकार,ताप, सर्दी खोकला यासारखे आजार असणारे व्यक्तींची प्राधान्याने चाचणी यामध्ये प्रथम करण्यात येणार आहे.शहरातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे.तसेच गरज असेल तरच घरा बाहेर पडा . अन्यथा पडू नका . तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा . सुरक्षित अंतर ठेवा . आणि महानगरपालिकेला सहकार्य करा . असे आवाहन महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी केले.
यावेळी महापालिका उपायुक्त अजयसिंह पवार, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते रियाज खरादी,नगरसेवक देवेंद्र कोठे,दिलिप कोल्हे,नगरसेवक बाबा मिस्त्री,उपजिल्हाधिकारी कारंडे ,आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे, अवेक्षक राहुल म्हेत्रे,राहुल चोबे, डॉ.वैशाली बारणे, डॉ.पारस, संगीता वैद्य, कोमल मोराळे, पांडुरंग सोनवणे, अशोक वेध व तसेच प्रभागातील नगरसेवक नगरसेविका आणि या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.