सोलापुर [ता : २६]/प्रमोद गोसावी
सोलापुरात कोरोनो विषाणूचा प्रसार वाढल्यामुळे कडक संचार बंदी सुरु आहे . पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संचारबंदीचे उलंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत . यामुळे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वतीने कडक अंमलबजावणी सुरु असून बाळे येथील मडकी वस्तीतील वरद फार्म आणि आवसेवस्ती येथून संचारबंदीच उलंघन करून चोरून देशी व विदेशी कंपनीच्या दारूची विक्री सुरु असल्याचे समजताच धाड टाकून संबंधिता कडून 50 ते 60 हजारांची दारू जप्त केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली
ही विशेष कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांच्या मार्गदर्शनखाली डीबी पथकातील पोलीस नामदार बरडे, डोके, ढेकळे, ठोकळ, आणि कदम यांनी केली आहे या कारवाईमुळे अवैद धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत .