सोलापुर शहरातील दंडात्मक कारवाईत 342 व्यक्तींवर कारवाई ; 38850 / – रु दंड वसुल..

सोलापूर [ता : २७]/प्रमोद गोसावी

सोलापूर शहरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त पी.शिवशंकर यांनी शहरातील लॉकडाऊनमध्ये जे मेडिकल दुकानदार आणि सार्वजनिक ठिकाणी तसेच गल्ली बोळात गर्दी करून बसणे . अशा व्यक्ती मास्क तसेच सोशल डस्टटिंगचा पालन करत नाही . आणि एकाच ठिकाणी गर्दी करून बसणे आदी बाबत आदेशाचे पालन करत नाहीत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या नुसार जे सामान्य व्यक्ती मास्क तसेच सोशल डस्टटिंगचा पालन करत नाही . अशा ठिकाणी वेगवेगळ्या विभागीय कार्यालयाकडील आरोग्य निरिक्षक तसेच लॉकडाऊन अधिकारी यांच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
झोन क्र 1 मध्ये 12 व्यक्ती 1200 रु दंड ,
झोन क्र 2 — 66 व्यक्ती 7500 रु दंड ,
झोन क्र 3 — 112 व्यक्ती 13050 रु दंड ,
झोन क्र 4 — 38 व्यक्ती 3800 रु दंड,
झोन क्र 5 — 43 व्यक्ती 4900 रु दंड,
झोन क्र 6 — 29 व्यक्ती 2900 रु दंड,
झोन क्र 7 — 07 व्यक्ती 1100 रु दंड,
झोन क्र 8–. 32 व्यक्ती 3300 रु दंड,
इतर सेवक –03 व्यक्ती 300 रु दंड
अशी आज रोजी रक्कम 38850/- रू .इतका दंड वसुल करण्यात आला. जे लाेक आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांचेवर अत्यंत कडक कारवाई करणेबाबत आदेश देणेत आले आहेत.

error: Content is protected !!