दुकाने- बाजारपेठा रविवारी देखील सुरू राहणार आहे – उपायुक्त अजयसिंह पवार

सोलापूर [ता: ३]/प्रमोद गोसावी

         महापालिकेच्या मिशन पुनप्रार्रंभ योजनेंतर्गतच्या सुधारित आदेशानुसार शहरातील सर्व दुकाने- बाजारपेठा रविवारी देखील सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे . पण पी वन, पी टू हा नियम लागू राहणार आहे . अशी माहिती महापालिका उपायुक्त अजयसिंह पवार यांनी दिली.

          मनपाने नुकतेच ऑगस्ट महिन्यासंदर्भातील मिशन पुनर्प्रारंभसंदर्भातील आदेश काढले. या अंतर्गत अनेक निर्बंधांबाबत शिथिलता देण्यात आली आहे. या अंतर्गत पूर्वीच्या आदेशानुसार रविवारी सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचा नियम कायम आहे की नाही . याविषयी दुकानदार, व्यापार्‍यांमध्ये संभ्रमावस्था होती. याविषयी मनपाचे उपायुक्त अजयसिंह पवार यांनी खुलासा करताना सांगितले की, मनपाने 8 जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार यापुढेही शहरात कार्यपद्धती सुरु राहणार आहे. अनेक बाबींना शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये रविवारी सर्व दुकाने-बाजारपेठा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, मात्र दुकाने- बाजारपेठांबाबत पी वन, पी टू (सम-विषम) हा नियम शासनाच्या आदेशानुसार कायम ठेवला जाणार आहे. पुढील काळात शासनाच्या वतीने वेळोवेळी जारी केले जाणार्‍या सुधारित आदेशांची अंमलबजावणी शहरात करण्यात येणार आहे, असेही उपायुक्त अजयसिंह पवार यांनी सांगितले.

error: Content is protected !!