कोरोनामुळे करमाळ्यातील एकाचा मृत्यु

प्रमोद गोसावी
सोलापुर / ता : 18

       कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बार्शी येथे उपचार सुरु असलेल्या शहरातील एका बावन्न वर्षीय व्यक्तीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याने चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. शहरात शनिवारी एकशे एक जणांची कोरोना बाबतची ॲन्टीजिन रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यापैकी एकूण तीन पुरुषांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आला आहे
          तहसीलदार समीर माने यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या पंचवीस झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, सहा रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत. तर अठरा रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

error: Content is protected !!