प्रमोद गोसावी
सोलापुर / ता : 18
अक्कलकोट शहरातील प्रभाग क्र.6 मध्ये जास्त संख्येने कोरोना रुग्ण आढळल्याने तहसीलदार अंजली मरोड ,पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी कोरोना प्रादुर्भाव झालेल्या भागात फिरून सर्व नागरिकांना अँटीजन किट तपासणी करून घेण्यासाठी आवाहन केले. यावेळी नगरसेवक महेश हिंडोळे, बाळा शिंदे, नगरपालिका अधिकारी विठ्ठल तेली व राऊत , यांच्या
सह स्वयंसेवक अनिकेत शेटे ,बालाजी पाटील, धनंजय गडदे, बनजगोळ,ज्ञानेश्वर भोसले उपस्थित होते.