जन्मदात्या पित्याचा मुलाकडुन खुन ; परिसरात हळहळ

सोलापूर /ताः ३१

         गाळे विकण्याच्या कारणावरून जन्मदात्या पित्याचा तोंड व गळा दाबून मुलाने खून केल्याची घटना अंजनगाव उमाटे (ता.माढा ) येथे आज दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली . रमेश विठ्ठल माळी (वय वर्ष 50 ) असे मयताचे नांव असुन याबाबत मयताची पत्नी अंजना रमेश माळी हिने मुलगा गणेश रमेश माळी याचे विरोधात माढा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे .

       याबाबत अधिक माहिती अशी की , अंजनगाव उमाटे ग्रामपंचायत हद्दीत रमेश माळी यांच्या मालकीचे गावाच्या चौकातच गाळे होते . सदरचे गाळे विक्री करण्याचा मानस मयत रमेश माळी यांचा होता . गाळे विक्रीस मुलाचा विरोध होता . आज याच कारणावरून बापलेकात भांडणे झाली . मयत रमेश हा गाळे विकणारच असे म्हणाल्याच्या कारणावरून चिडुन आरोपी गणेश याने मयत रमेश याचे माणेवर बुक्कीने मारहाण करून तो खाली पडल्यानंतर त्यांचा गळा व तोंड दाबून त्यास जीवे ठार मारले . अशी तक्रार मयताची पत्नी अंजना रमेश माळी हिने माढा पोलिसांत दाखल केली आहे . पुढील तपास सहा . पोलिस निरीक्षक अमुल कादबाने हे करीत आहेत .

error: Content is protected !!