दिनविशेष 1  एप्रिल 2024

१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.

१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.

१९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.

१९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवम

१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.

१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.

२००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

१५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म.

१६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म.

१८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म.

१८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म.

१९०७: भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.

१९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म.

१९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.

१९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.

१९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन.

१९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन.

१९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.

२०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन.

२००३: गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.

२००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन.

२०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन.

error: Content is protected !!