दिनविशेष 11 डिसेंबर 2023

१८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.

१९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

१९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.

१९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.

१९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.

२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.

१८४३: क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म.

१८६७: आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचा जन्म.

१८९२: पद्मभूषण, रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू, राज्यसभा खासदार, योजना आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष, ओरिसाचे राज्यपाल, पद्मविभूषण अयोध्या नाथ खोसला यांचा जन्म.

१८९९: कादंबरीकार पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

१९०९: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद कालेलकर यांचा जन्म.

१९१५: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म.

१९२२: अभिनेते मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांचा जन्म.

१९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म.

१९२९: लेगस्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म.

१९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.

१९४२: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म.

१९६९: भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म.

१७८३: रघुनाथराव पेशवा यांचे निधन.

१९७१: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचे निधन.

१९८७: लेखक गुरुनाथ आबाजी कुलकर्णी उर्फ जी. ए. कुळकर्णी यांचे निधन.

१९९२: भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांचे निधन.

१९९८: राष्ट्रकवी प्रदीप यांचे निधन.

२००१: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचे निधन.

२००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन.

२००२: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचे निधन.

२००४: भारतरत्न गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन.

२०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.

२०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!