दिनविशेष 11  मार्च 2024

१८१८: इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.

१८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

१८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

१९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.

१९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.

१९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

२००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

१८७३: युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म.

१९१२: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.

१९१५: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म.

१९८५: श्रीलंकेचा गोलंदाज अजंता मेंडिस यांचा जन्म.

१६८९: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन.

१९५५: नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन.

१९५७: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.

१९६५: गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचे निधन.

१९७०: अमेरिकन लेखक आणि वकील अर्ल स्टॅनले गार्डनर यांचे निधन.

१९६९: संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन.

१९९३: हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन.

error: Content is protected !!