दिनविशेष 12  मार्च 2024

१८९४: कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.

१९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.

१९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.

१९३०: महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.

१९९१: जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी.

१९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.

१९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.

१९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

१९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मधे सामील झाले.

२००१: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.

१९११: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्म.

१९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म.

१९३३: लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.

१९३१: साउथवेस्ट एअरलाईन्स चे सहसंस्थापक हर्ब केलेहर यांचा जन्म.

१९८४: प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोशाल यांचा जन्म.

१९४२: जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन.

१९६०: भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन.

१९९९: प्रसिध्द व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहुदी मेनुहिन यांचे निधन.

२००१: अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचे निधन.

error: Content is protected !!