दिनविशेष 13 डिसेंबर 2023

१९३०: प्रभात चा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

१९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.

२००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.

२०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.

२०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.

१७८०: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा जन्म.

१८९९: छायालेखक (cinematographer) पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म.

१९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म.

१९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.

१९५५: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म.

१७८४: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचे निधन.

१९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन यांचे निधन.

१९८६: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन.

१९९४: सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर

१९९६: स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये यांचे निधन.

२००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन.

error: Content is protected !!