दिनविशेष 16  मार्च 2024

१५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.

१६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.

१९१९: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.

१९३६: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

१९४३: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.

१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.

१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.

२००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.

१६९३: इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म.

१७८९: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म.

१९०१: भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म.

१९१०: ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म.

१९३६: संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.

१९३६: चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.

१९४५: भिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर उर्फ ग. दा. सावरकर यांचे निधन.

१९४६: जयपूर अत्रोली घराण्याचे गायक उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे मुंबई येथे निधन.

१९९०: संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक वि. स. पागे यांचे निधन.

२००७: बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचे निधन.

error: Content is protected !!