दिनविशेष 17 डिसेंबर 2023

१७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

१७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.

१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.

१९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.

१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

२०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

२०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.

२०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.

१७७८: विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचा जन्म.

१८४९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा कलकत्ता येथे जन्म.

१९००: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचा जन्म.

१९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचा जन्म.

१९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म.

१९११: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचा जन्म.

१९३४: पत्रकार, द हिन्दू चे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म.

१९४७: दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer) दीपक हळदणकर यांचा जन्म.

१९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम यांचा जन्म.

१९७८: अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म.

१७४०: पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचे निधन.

१९०७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचे निधन.

१९२७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचे निधन.

error: Content is protected !!