दिनविशेष 18 डिसेंबर 2023

१२७१: कुबलई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश सुरू केले.

१७७७: अमेरिकेत पहिले थँक्सगिव्हिंग साजरे करण्यात आले.

१८३३: रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले

१९३५: श्रीलंकेत लंका सम समाज पार्टी ची स्थापना केली.

१९५८: जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.

१९५९: ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये एचएमएस हार्मिस हि युद्धनौका दाखल झाली.

१९७८: डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.

२००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.

२०१६: इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.

२०१६: भारतीय ज्युनिअर हॉकी टीम ने बेल्जियम ला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.

१६२०: जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्‍रिच रॉथ यांचा जन्म.

१८७८: सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचा जन्म.

१८८७: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचा जन्म.

१८९०: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म.

१९४६: ड्रीमवर्क्सचे सहसंस्थापक स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा जन्म.

१९५५: भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांचा जन्म.

१९६१: माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचा जन्म.

१९६३: अमेरिकन अभिनेते व निर्माते ब्रॅड पिट यांचा जन्म.

१९७१: पत्रकार बरखा दत्त यांचा जन्म.

१९७१: स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ यांचा जन्म.

१८२९: फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे लॅमार्क यांचे निधन.

१९७३: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी यांचे निधन.

१९८०: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचे निधन.

१९९३: चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर यांचे निधन.

१९९५: राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे निधन.

२०००: इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे निधन.

२००४: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचे निधन.

२०११: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लाव हेवल यांचे निधन.

error: Content is protected !!