दिनविशेष 2 फेब्रूवारी 2024

१९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.

१५५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.

१९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.

१९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला

१७५४: फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म.

१८५६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म.

१८८४: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म.

१८९७: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म.

१९२२: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म.

१९२३: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्‍या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म.

१९७९: भिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.

१९०७: रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन.

१९१७: लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला.

१९३०: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन.

१९७०: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन.

१९८७: स्कॉटिश साहसकथा लेखक अ‍ॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन.

२००७: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन.

error: Content is protected !!