दिनविशेष 2 मार्च 2024

१८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.

१८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.

१९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.

१९४६: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.

१९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.

१९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.

१९५६: मोरोक्‍को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.

१९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.

१९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

१७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म.

१९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म.

१९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.

१९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.

१५६८: मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.

१७००: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन.

१८३०: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेन्स यांचे निधन.

१९४९: प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.

१९७६: मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.

१९९४: धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.

error: Content is protected !!