दिनविशेष 21 डिसेंबर 2023

१९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.

१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.

१९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.

१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९१८: संयुक्त राष्ट्रांचे ४थे सरचिटणीस कुर्त वाल्ढहाईम यांचा जन्म.

१९२१: भारताचे १७ वे सरन्यायाधीश पी. एन. भगवती यांचा जन्म.

१९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म.

१९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.

१९५४: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू ख्रिस एव्हर्ट लॉइड यांचा जन्म.

१९५९: फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांचा जन्म.

१९५९: अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर यांचा जन्म.

१९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.

१९७२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म.

१८२४: कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचे निधन.

१९६३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक हॉब्ज यांचे निधन.

१९७९: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचे निधन.

१९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी यांचे निधन.

१९९७: भावगीतलेखक निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम यांचे निधन.

२००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन.

२००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन.

error: Content is protected !!