दिनविशेष 21  मार्च 2024

१५५६: ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे सांगणार्‍या आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.

१६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.

१८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.

१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.

२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून एरियन ५०५ या वाहकाद्वारे भारताचा इन्सॅट ३ बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

२००३: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.

२००६: सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.

२०१२: आंतरराष्ट्रीय वन दिन

१७६८: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म.

१८४७: कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म.

१८८७: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म.

१९१६: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म.

१९२३: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म.

१९७८: अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.

१९७३: कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन.

१९७३: आतुन कीर्तन वरुन तमाशा या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

१९८५: ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन.

२००१: दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई चे स्थापक चुंग जू-युंग यांचे निधन.

२००३: भारतीय लेखक शिवानी यांचे निधन.

२००५: चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक दिनकर द. पाटील यांचे निधन.

२०१०: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन.

error: Content is protected !!