दिनविशेष 23 डिसेंबर 2023

१९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन.

१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.

१९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.

२०००: कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी

२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

२०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.

१८५४: ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेन्‍री बी. गुप्पी यांचा जन्म.

१८९७: ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालिचरण पटनाईक यांचा जन्म.

१९०२: भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म.

१८३४: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचे निधन.

१९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या.

१९६५: नट व गायक, गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन.

१९७९: हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचे निधन.

१९९८: स्वातंत्र्यसैनिक रत्‍नाप्पा कुंभार यांचे निधन.

२०००: मलिका-ए-तरन्नुम म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन.

२००४: भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन.

२००८: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचे निधन.

२०१०: केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री, युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक के. करुणाकरन यांचे निधन.

२०१०: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन.

२०१३: एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन.

२०१३: भारतीय कवी आणि शिक्षक जी. एस. शिवारुद्रप्पा यांचे निधन.

error: Content is protected !!