दिनविशेष 23 जानेवारी 2024

१५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर.

१७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.

१८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर बनल्या.

१९३२: प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.

१९४३: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर जिंकले.

१९६८: शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.

१८१४: भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म.

१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म.

१८९८: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचा जन्म.

१९१५: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचा जन्म.

१९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म.

१६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन.

१९१९: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचे निधन.

१९३१: द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अ‍ॅना पाव्हलोव्हा यांचे निधन.

१९५९: शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित विठ्ठल नारायण चंदावरकर यांचे निधन.

१९८९: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचे निधन.

१९९२: भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर यांचे निधन.

२०१०: शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचे निधन.

error: Content is protected !!