दिनविशेष 23  मार्च 2024

१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.

१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.

१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.

२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.

१८८१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म.

१८८३: कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म.

१८९८: आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म.

१९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म.

१९१२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.

१९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म.

१९२३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म.

१९५३: भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार-शॉ यांचा जन्म.

१९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.

१९८७: अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.

१९३१: क्रांतिकारक भगत सिंग यांना फाशी.

१९३१: क्रांतिकारक सुखदेव थापर यांना फाशी.

१९३१: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांना फाशी.

२००७: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.

२००८: मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.

२०११: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन.

error: Content is protected !!