दिनविशेष 24 डिसेंबर 2023

१७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

१९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.

१९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.

१९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

२०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.

१९८६: भारतीय ग्राहक दिन.

११६६: इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म.

१८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म.

१८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म.

१८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म.

१९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म.

१९३२: भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिन काऊड्रे यांचा जन्म.

१९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म.

१९५९: : हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.

१५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन.

१९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन.

१९९३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन.

१९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन.

१९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन.

१९८८: भारतीय लेखक जैनेंद्र कुमार यांचे निधन.

२०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन.

२००५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका भानुमती रामकृष्ण यांचे निधन.

error: Content is protected !!