दिनविशेष 27 नोहेंबर 2023

१८१५: पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.

१८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.

१९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.

२०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.

१७०१: स्वीडिश खगोलशास्त्र व संशोधक अँडर्स सेल्सियस यांचा जन्म.

१८७१: इटालियन भौतिकशास्रज्ञ जियोव्हानी जॉर्जी यांचा जन्म.

१८५७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म.

१८७०: इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांचा जन्म.

१८७४: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचा जन्म.

१८७८: भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म.

१८८१: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म.

१८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.

१८९४: पॅनासोनिक चे संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांचा जन्म.

१९०३: नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेगर यांचा जन्म.

१९०७: विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन यांचा जन्म.

१९०९: रशियन गणितज्ञ अनातोली माल्त्सेव यांचा जन्म.

१९१५: मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी यांचा उरण, रायगड येथे जन्म.

१९४०: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ ब्रूस ली यांचा जन्म.

१९५२: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.

१७५४: फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचे निधन.

१९५२: तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन.

१९६७: गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष लेओन मब्बा यांचे निधन.

१९७५: गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन.

१९७६: प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन.

१९७८: भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन.

१९९४: स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन.

१९९५: दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.

२०००: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन.

२००२: भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन.

२००७: गेटोरेड चे सहनिर्माते रॉबर्ट केड यांचे निधन.

२००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन.

error: Content is protected !!