दिनविशेष 29  मार्च 2024

१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

२०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.

१९४२: क्रिप्स योजना जाहीर

१८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म.

१९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म.

१९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म.

१९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.

१९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.

१९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

१५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन.

१९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.

१९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन.

error: Content is protected !!