दिनविशेष 3  एप्रिल 2024

१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाइल कॉल केला.

२०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

२०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.

२०१६: पनामा पेपर्स हे कायदेशीर दस्तऐवज प्रसिद्ध होऊन सुमारे २,१४,४८८ कंपन्याची गोपनीय माहिती उगढ झाली.

१७८१: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचा जन्म.

१८८२: सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव यांचा जन्म.

१८९८: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लुस यांचा जन्म.

१९०३: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म.

१९०४: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचा जन्म.

१९१४: फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म.

१९३०: जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह यांचा जन्म.

१९५५: सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांचा जन्म.

१९६२: चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य जयाप्रदा यांचा जन्म.

१९६५: पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म.

१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू निलेश कुलकर्णी यांचा जन्म.

१६८०: छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन.

१८९१: फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन.

१९८१: पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक जुआन त्रिप्प यांचे निधन.

१९८५: महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचे निधन.

१९९८: इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन.

१९९८: प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचे निधन.

२०१२: भारतीय राजकारणी गोविंद नारायण यांचे निधन.

error: Content is protected !!