दिनविशेष 3 फेब्रूवारी 2024

१७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

१९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.

१९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला

१९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.

१८२१: वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म.

१८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म.

१८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.

१९००: रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म.

१९६३: भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.

१४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.

१८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.

१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.

१९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन.

error: Content is protected !!