दिनविशेष 30  मार्च 2024

१६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

१९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

१८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म.

१९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म.

१९०८: अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म.

१९४२: भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

१९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.

१९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन.

१९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन.

१९८१: रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास यांचे निधन.

१९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन.

२००२: गीतकार आनंद बक्षी यांचे निधन.

२००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन.

२०१२: कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.

error: Content is protected !!