दिनविशेष 31  मार्च 2024

१६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

१८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

१८८९: आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

१९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

१९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

१९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

२००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

१५९६: फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेनें देंकार्त यांचा जन्म.

१८४३: नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.

१८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म.

१८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म.

१९०२: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म.

१९३४: भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म.

१९३८: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा जन्म.

१९७८: भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म.

१९७२: अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन.

२०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचे निधन.

२००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन.

२००४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन.

२००४: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन.

error: Content is protected !!