दिनविशेष 4 एप्रिल 2024

१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.

१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी नाटो (NATO) या संस्थेची स्थापना केली.

१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

१८२३: जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्हेम सीमेन्स यांचा जन्म.

१८४२: फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचा जन्म.

१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक एवेरी फिशर यांचा जन्म.

१९०२: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं नारायणराव व्यास यांचा जन्म.

१९२६: अॅमवे कंपनी चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.

१९३३: डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म.

१९७३: भारतीय संचालक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

१६१७: स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपिअर यांचे निधन.

१९२३: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचे निधन.

१९२९: मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे निधन.

१९३१: फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचे निधन.

१९६८: नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनियर) यांची हत्या झाली.

१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भत्तो यांचे निधन.

१९८७: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन.

१९९६: संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचे निधन.

२०००: कलादिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचे निधन.

२०१६: भारतीय वकील आणि राजकारणी पी. ए. संगमा यांचे निधन.

error: Content is protected !!