दिनविशेष – १६ एप्रिल

१८५३: भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.

१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.

१९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

१९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.

१८६७: ऑर्व्हिल राइट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राइट यांचा जन्म.

१८८९: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचा जन्म.

१९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग यांचा जन्म.

१९३४: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांचा जन्म.

१९४२: विल्यम्स एफ-१ रेसिंग टीमचे स्थापक फ्रॅंक विल्यम्स यांचा जन्म.

१९६१: भारतीय वकील आणि राजकारणी जर्बोम गॅमलिन यांचा जन्म.

१९६३: पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांचा जन्म.

१९७२: स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू कोंचिता मार्टिनेझ यांचा जन्म.

१९७८: मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता यांचा जन्म.

१९९१: चित्रपट आणि नाटक अभेनेते आशिष खाचणे यांचा जन्म.

१७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन. 

१८५०: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन.

१९६६: शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचे निधन. 

१९९५: अभिनेते आणि वकील रमेश टिळेकर यांचे निधन.

२०००: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू तसेच शाहू महाराजांचे चरित्रकार अप्पासाहेब पवार यांचे निधन.

संग्रहित माहिती

error: Content is protected !!