१७७०: प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
१९३९: अॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
२००८: डॅनिका पॅट्रिक ह्या इंडी कार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या.
७८८: आदि शंकराचार्य यांचा जन्म.
१७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
१८०८: फ्रान्सचे पहिले अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) यांचा जन्म.
१८९६: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म.
१९१४: ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म.
१९३९: ध्रुपद गायक सईदुद्दीन डागर यांचा जन्म.
१९८०: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक अरीन पॉल यांचा जन्म.
१९३८: न्यायाधीश व कायदेपंडित चिंतामणराव वैद्य यांचे निधन.
१९६०: बासरीवादक संगीतकार पन्नालाल घोष यांचे निधन.
१९७०: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन.
Special day – April 20 संग्रहित माहिती