नरंदेत कराची रक्कम भरण्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हातकणंगले / प्रतिनिधी

१५ दिवसात वसुली १० लाखांच्यावर वर

    नरंदे ( ता.हातकणंगले ) येथील ग्रामपंचायतीची वार्षिक पाणीपट्टी व घरफाळा भरण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही प्रकारचा कर वसुलीसाठीचा तगादा न लावताही नागरिक उस्फूर्तपणे कराची रक्कम भरत आहेत. नागरिकांना गावांमध्ये दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सोयी सुविधा, नियमित पाणीपुरवठा, पक्के रस्ते, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायती मार्फत वेळेत दिले जाणारे दाखले वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिक स्वतः ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कराची रक्कम भरताना दिसत आहेत. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये कर वसुलीसाठी अनेक उपयोजना कराव्या लागत आहेत . यामध्ये नळ कनेक्शन तोडणे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन पाणीपट्टी व घरफाळा गोळा करत आहेत. यांसारख्या अनेक प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागत आहेत. मात्र हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावात मात्र नागरीक स्वतः ग्रामपंचायत कार्यालयात येऊन कराची रक्कम भरत आहेत. गेल्या १५ दिवसात वसुली १० लाखांच्यावर वर झाली असून गावच्या विकासासाठी १०० टक्के करवसुली होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अजूनही कराची रक्कम जमा केली नसेल त्यांनी ३१ मार्च पूर्वी जमा करून अतिरिक्त ५ टक्के दंड भरण्यापासून टाळावा असे आवाहनही यावेळी नरंदे ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे

error: Content is protected !!