रोहन साजणे/आळते प्रतिनिधी
श्री श्री किसान विकास मंच देशी गाय दूध संकलन केंद्र आळतेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्वसामान्य नागरिकांना देशी गाईची दूध मिळावे व येणारी पिढी सक्षम आरोग्यदायी घडावी या विचाराने व श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रेरणेने आळते गावात 2017 मध्ये श्री श्री किसान विकास मंच ची स्थापना करण्यात आली.

शेतकऱ्यांचा गट करून गाईंचे दूध संकलन करून आसपासच्या शहरांमध्ये घरपोच देण्याची सोय या केंद्रामार्फत केली जाते. याप्रसंगी श्री श्री रविशंकर जी यांच्या फोटोचे पूजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अण्णासो अंकलीकरांनी शेतकऱ्यांना गाईच्या संगोपन विषयी मार्गदर्शन केले. गुंडू पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शीतल हावळे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी प्रकाश टारे, बाळासो सक्कांना, संदीप पाटील, अनिकेत कनवाडे, अमोल चौगुले, विकास टारे, शितल शेटे यांच्यासह अनेक शेतकरी व दूध उत्पादक उपस्थित होते.